स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) – चोपडा रोडवरील मंगळनगरातील राहाणारा अट्टल गुटखा किंगच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून असंख्य बॉक्समध्ये ५ लाख १५ हजार १२० रुपयांचा गुटखा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मंगळनगरातील गोकुळ जगन्नाथ पाटील याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक उपनिरीक्षक नारायण पाटील हे.काँ. रामचंद्र बोरसे, हे. काँ. सुनील दामोदर, पोना. मनोज दुसाने, पो.काँ दीपक शिंदे, परेश महाजन आणि चालक प्रवीण हिवराळे यांनी गोकूळ पाटील याच्या घरावर छापा टाकला. यात विमल २ पोते, सागर १० पोते, मिराजचे ४ बाँक्स गुटखा मिळून आला. त्याची बाजारभावानुसार ५ लाख १५ हजार १२० रुपये किंमत आहे. याप्रकरणी गोकूळ पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई करीता अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.







