संभाजी देवरे खान्देश विभागिय संघटक तर ईश्वर महाजन यांची अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड
अमळनेर (प्रतिनिधी) – वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सचीव गणेश पुजारी यांनी नुकतीच जाहीर केली.
वेब मीडिया असोसिएशनची मुंबई येथे बैठक घेतली व कार्यकारिणी घोषित केली.
वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून त्यांच्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील पोर्टलला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत. यासाठी त्यांनी अगोदर वेब असोसिएशनची झूम मीटिंग द्वारे पत्रकारांशी संपर्क साधला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक मोठे संघटन उभे राहणार आहे.
अमळनेर येथील ( महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई- सदस्य) लोक न्यूज पोर्टलचेे संपादक संभाजी देवरे यांची खानदेश विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मराठी लाईव्ह न्युजचे संपादक ईश्वर महाजन यांची वेब पोर्टल असोसिएशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.







