जळगाव [प्रतिनिधी] – शहरातील उद्योजक आणि खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग लागून महत्वाची कागदपत्रे जळाल्याची घटना आज शुक्रवारी ९ ऑकटोबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली

खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांचे खान्देश मिल कॉम्लेक्समध्ये कार्यालय आहे . आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे शिपाई समाधानने कार्यालय उघडले. विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी मुख्य स्विच सुरु केले. तेव्हा कार्यालयामधील संगणक कक्षात मोठा आवाज झाला. हे बघण्यासाठी समाधान गेला, तेव्हा तिथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे लक्षात आले. तेव्हा समाधाने स्विच बंद केला. तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. संगणक कक्षात लाकडाचे फर्निचर असल्याने आग जोरदार भडकली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या २ बंबांनी हि आग आटोक्यात आणली . या आगीत महत्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती रमेशदादा यांनी दिली. यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. कोरोना मुळे मी कार्यालयात जात नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याहच अंदाज रमेशदादा जैन यांनी केसरीराजशी बोलताना व्यक्त केला. याबाबत दुपारपर्यंत पोलीसात कुठलीही नोंद नव्हती.









