मनपातील महापौर दालनाजवळ घडला प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महाबळ परिसरातील भाजपचे पदाधिकारी असलेले भूपेश कुलकर्णी यांची गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेदोन वाजता
नगरसेविका पती व महापालिकेचे कर्मचारी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी चक्क महापौरांच्या दालना जवळ वाद झाला. एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत एकमेकांवर दालनातील खुर्च्या उगारल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुरुवारी महापालिकेत प्रभाग समिती सभापती पदासाठी निवड प्रकीया पार पडली. ही प्रकीया आटोपल्यानतंर काही नगरसेवक व नगरसेविका हे स्थायी सभापती यांच्या दालनात बसलेले असतानांच महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात महापौर दालना जवळ जोरदार बाचाबाची झाली. यानंतर चक्क महापौरांच्या कक्षात जाऊन देखील तेथे एकमेकांवर खुर्च्या उगारल्याचा प्रकार घडल्याची माहिती इतर कर्मचाऱ्यांकडून मिळाली. यामुळे भाजपच्या गोटामध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब चव्हाण हे नगरसेविका व स्थायी समिती सदस्य ज्योती चव्हाण यांचे पती आहेत. ज्योती चव्हाण ह्या प्रभाग क्रमांक १३ या महाबळ परिसरातील नगरसेविका आहेत, तर भूपेश कुलकर्णी हा महाबळ परिसरातीलच भाजपच्या कार्यकारिणीवर पदाधिकारी आहेत.
याबाबत भाजपाचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले की, महापालिकेत महापौर यांच्या दालनाबाहेर आपण थांबलेलो असतांनाच मनपा कर्मचारी बाळासाहेब चव्हाण जवळ आलेत. त्यांनी तु माझ्या वार्डात काम करतो, त्या कामाचा हिशोब करुन पैसे दिले नाही म्हणून वाद घालू लागले. मी त्यांना पैशाचा विषय बोलण्याची ही जागा नसल्याचे सांगीतले. तरी देखील त्यांनी मला शिविगाळ केल्याने वाद झाला. त्यानतंर महापौरांच्या दालनात देखील त्यांनी पैशाची मागणी करीत शिवीगाळ सुरुच ठेवली. तसेच दालनातील खूर्ची माझ्यावर उगारुन माझ्या अंगावर धावून आल्याचा आरोप कुळकर्णी यांनी माध्यमांकडे केला.
बाळासाहेब चव्हाण यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माझा कुणाशीच वाद झाला नसल्याचा दावा केला. तसेच मला काहीच बोलायचे नाही असे देखील सांगीतले.







