मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी गट नेते विनोद तराळ तसेच युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या परवानगीने संत मुक्ताईच्या आवारामध्ये युवक जिल्हा उप अध्यक्ष अँड. पवनराजे सुधाकर पाटील यांच्या हस्ते युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सदर प्रसंगी कार्य अध्यक्ष सोपान दुत्ते , जिल्हा सरचिटणीस प्रवीण दामोदरे ,तालुका अध्यक्ष सईद खान रशीद खान, कार्य अध्यक्ष राजेश ढोले, तालुका उप अध्यक्ष वैभव पाटील, राजेंद्र पाटील, संघटक हर्षल पाटील, चिटणीस कपिल पाटील , जिल्हा परिषद गट अध्यक्ष विजय कापसे , सरचिटणीस जितेंद्र अभिमान तायडे , शहर अध्यक्ष ऋषिकेश पाटील , अविनाश जैन , राजू कोळी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.







