वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वर्डी हे गाव तसे बहू लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या मानाने ग्राम पंचायती संबधी दैनदिन कामांची वर्दळ तशी असतेच परंतू प्रशासकीय नेमणूक झाली तेव्हा पासून ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे होवून गेला आहे. नुकत्याच तालुक्यात कार्यकाळ संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक बसल्याने प्रशासकीय अधि. नियुक्त करण्यात आले आहे. याच अनुषगांने वर्डी ग्राम पंचायतीवर शासनाने प्रशासकीय अधिकारी म्हणून. एस टी मोरे यांची नियुक्ती केली आहे. श्री. मोरे यांची नियुक्ती होवून १ महिना झाला तरी महीन्या पासून ते वर्डी गावात फक्त एकदाच आले त्यानंतर ते फिरकलेच नाहीत अथवा त्याना जावेसे देखील वाटत नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार टाकून गांधीगिरी केली. गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनाने यांना नियुक्त केले आहे, पण ग्रामपंचायत कार्यालयात जर प्राशासकीय अधिकारीच नसेल तर नागरीकांच्या समस्या कोन सोडविणार हा प्रश्न गावातील नागरीकांना असून नागरीक काही कागदावर सही घेण्यासाठी फोन लावतात तर प्रशासक एस.डी.मोरे हे उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्राम पंचायत कार्यालयातील ग्रामसेवक हे प्रशासनाच्या परवानगी शिवाय काम करू शकत नाही,म्हणून शासनाने या समस्येकडे त्वरीत लक्ष द्यावे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष लहुश धनगर, माजी उपसरपंच सचिन डाभे,भरत पाटील, गुलाब ठाकरे, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, श्याम नायदे, प्रदीप शिंदे आदी उपस्थित होते.