जळगाव (प्रतिनिधी) – येथील अजिंठा चौफुली परिसरामध्ये एका व्यक्तीला ६३ हजार ९१० किंमतीचा गुटखा वाहतूक करतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यासह दोघांविरुद्ध भादंवि. कलम २७२, २७३, ३२८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
एलसीबीचे पोहेकॉ. विजयसिग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. एक व्यक्ती ऍक्टिव्हा दुचाकी या विना नंबरप्लेट वाहनावर नेरीकडून- जळगावकडे विमल गुटक्याच्या गोण्या घेऊन जात आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुनील दामोदर, राहुल पाटील, विनायक पाटील, किरण चौधरी अश्यांनी अजिंठा चौकामध्ये बुधवारी दि. ७ रोजी सकाळी १०. २० वाजता ऍक्टिव्हा दुचाकीवर जाणाऱ्या इसमास पकडले. त्याच्याकडून ६३ हजार ९१० किमतीचा गुटखा वाहतूक करतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडला. त्यास नाव विचारले असता, त्याने भगवान प्रभाकर पाटील (वय- ५२, रा. करमाळा,ता. जि. जळगाव ) असे सांगितले. त्याच्यासह विजय चौधरी (रा. एरंडोल ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.