• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या प्रकरणी ; चिंचखेड्याच्या माय-लेकाला सात वर्ष शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2020
in जळगाव
0

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल

भुसावळ (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु. येथे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील आलमपूरच्या 25 वर्षीय विवाहितेचा पतीसह सासूकडून सातत्याने छळ सुरू होता व या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरूवातीला मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल होती तर नंतर विवाहितेच्या कुटुंबियांनी पतीसह सासु-विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर आरोपींना ७ वर्ष शिक्षा व दंड सुनावण्यात आला.

तक्रारदार पार्वताबाई वसंता खराटे रा.आलमपूर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा यांची मुलगी यशोदा उर्फ योगीता अनिल खोंदले वय 25 हिचा 2011 मध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु.येथील अनिल तुकाराम खोंदले यांच्याशी विवाह झाला होता. पार्वताबाई यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांची शेती बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाकडून त्यांना सात लाखांची भरपाई मिळाली होती ही बाब खोंदले कुटुंबियांना कळाल्याने त्यांनी यशोदाचा लग्नानंतर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून सातत्याने शिवीगाळ व मारहाण करून छळ सुरू केला होता. मुलीचा होणारा छळ पाहता पार्वताबाई यांनी खोंदले कुटुंबियांना 50 हजार रुपये दिल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये मुलीला नांदवण्यासाठी नेण्यात आले मात्र छळ कायम सुरू राहिला. छळ असह्य झाल्याने 16 मार्च 2017 रोजी सकाळी यशोदाने आपल्या आईला फोन करून त्रासाची माहिती देत माहेरी नेण्याची विनंती केली होती तर दुपारी चुलत दीर विकास खोंदले यांनी यशोदाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला मयत विवाहितेच्या पतीने मुक्ताईनगर पोलिसात पत्नी संतापी असल्याचे सांगत ती नेहमीच भांडण करीत असल्याने तिने संतापात कापसावर फवारणीचे कीटकनाशक प्राशन केल्याचे भासवत मुक्ताईनगर पोलिसात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

असा झाला होता गुन्हा दाखल
मयत यशोदा हिचा पती अनिल तुकाराम खोंदले व सासु यशोदाबाई तुकाराम खोंदले चिंचखेडा बु., ता.मुक्ताईनगर यांनी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये न आणल्याने छळ चालवला होता व छळ असह्य झाल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची तक्रार पार्वताबाई खराटे यांनी दिल्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सरकारी वकीलांनी सहा साक्षीदार तपासले व त्यात आईसह भाऊ व मेहुण्याची साक्ष महत्वाची ठरली. न्या.आर.आर.भागवत यांनी आरोपी पती अनिल खोंदले यास भादंवि 304 ब अन्वये सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा 10 हजार रुपये दंड तसेच सासु यशोदाबाई खोंदले यांना 498 अ मध्ये तीन वर्ष साधी शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावी बाजू मांडली तर आरोपींतर्फे अ‍ॅड.मोरे मलकापूर यांनी युक्तीवाद केला. तत्कालीन तपासाधिकारी हेमंत कडूकार यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला.


 

 

Previous Post

लोढरी तांडा येथील युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

Next Post

उत्तर प्रदेशमधील दुदैवी घटनेच्या निषेधार्थ पारोळ्यात भव्य रॅली,

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर प्रदेशमधील दुदैवी घटनेच्या निषेधार्थ पारोळ्यात भव्य रॅली,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon