नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 206 आहे, असे भारतीय वैद्यक संशोधन पषिदेने (आयसीएमआर) शुक्रवारी सकाळी जाहीर केले. मात्र या भयावह साथीच्या पार्श्वभूमीवर, आयोध्येत 24 मार्चला होणाऱ्या राम जन्म सोहोळ्याला उपस्थित राहू नका, असे मी भाविकांना सांगू शकत नाही, असे धक्कादायक विधान राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपलादास यांनी केले आहे. ते म्हणाले, या धोक्याबाबत जनजागरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. नदी किनाऱ्यावर होणाऱ्या या पुरातन मेळाव्याला भाविकांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन मी करू शकत नाही. कोरोनाच्या धोक्याची जाणीव करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.नवरात्री आणि नवसंवत्सरच्या संध्येला आणि रामनवमीच्या आदल्या दिवशी आयोध्येतील रामकोट परिक्रमा रद्द केली आहे. हा निर्णय विक्रमादित्य महोत्सव समितीने घेतला आहे. या समितीचे महंत राजकुमार दास यांनी सांगितले की, लोकांनी आपली पूजा घरात करावी. कारण कोरोना ही साथ आहे. परिक्रमा/मेला दरवर्षी येत असतात.विश्व हिंदू परिषदेचे राम नवमी मेला रद्द करण्याचा निर्णय झाला नाही. मात्र लोकांनी सहभागी होऊ नये म्हणून महंत नृत्य गोपालदास यांनी आवाहन करावे. तत्पुर्वी आयोध्येचे मुख्य आरोग्य अधिकारी घन:श्याम सिंह म्हणाले, कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी राम नवमी मेला रद्द करावा. लोकांनी एकत्र येणे टाळायला हवे नाही तर साथ प्रतिबंध कायद्याचा वापर करायला हवा, असे मत कोरोनाचे नोडल अधिकारी विकासेंदू अग्रवाल यांनी केले.