जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील मेस्कोमाता नगरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणावर शनी पेठ पोलीसांनी कारवाई केली. शनीपेठ पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेस्कोमाता नगरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आणि अवैध गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. शनीपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी पोहेकॉ अनिल कांबळे, हकिम शेख, दिनेशसिंग पाटील यांना कारवाईच्या सुचना दिल्यात. त्यानुसार पथकाने शनिवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास पोलीसांची कारवाई करत संशयित आरोपी शांताराम पुंडलिक महाजन (वय-३२) रा.मेस्कोमाता नगर याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ९३० रूपयांची ३० लिटर गावठी दारू हस्तगत केली. पोहेकॉ अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.