वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील रा. कॉ. ची विद्यार्थी नुतन कार्यकारणी नुकतीच जेष्ठ नेते व पदधिका-यांच्या आणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
चोपडा विद्यार्थी तालुका कार्यकारीणी माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते प्रा. अरुण गुजराथी साहेबांच्या व पिपल बँकेंचे चेअरमन चंद्रहास गुजराथी अध्यक्षते खाली जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शना खाली नुतन कार्यकारणी रचली गेली. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष लहुश धनगर , सतीश पाटील, आदी उपस्थित होते. नुतन कार्यकारणी निवड करण्यात आलेल्या पदस्य पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष पदी उर्वेश साळुंखे, ( बुधगाव) शहरं अध्यक्ष मयुर पाटील, (चोपडा) उपाध्यक्ष जयेश सनेर (हातेड) कार्यध्यक्ष सौरभ ठाकरे (मंगळुड) कार्यध्यक्ष कुणाला पाटील (गणपुर ) सरचिटणीस कुलदीप पाटील (चहार्डी ) सरचिटणीस भुषण कुंभार (गोरगावले) सरचिटणीस नितेश सोनवणे (काजीपुरा ) सरचिटणीस पुष्कराज पाटील ( उंटावद) संपर्क प्रमुख हर्षवर्धन सोनवणे (हातेड.खु) संपर्क प्रमुख जयेश पाटील (चहार्डी) सचिव चेतन शिरसाठ (अनवर्दे) नुतन कार्यकारणीचे अरुण भाई गुजराथी, व मा. चंद्रहास गुजराथी, मा. राजेंद्र पाटील, मनोज पाटील, आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. व पुढच्या पक्ष कार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








