अमळनेर (प्रतिनिधी) – तालूक्यात तालूका कृषी विभागाच्या वतीने आयोजित उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिम व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत 2 ट्रॅक्टर व मळणी यंत्र कृषी औजारे वितरण नुकतेच आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत तालुका कृषी विभागाच्या वतीने पारदर्शकपणे यांत्रिकीकरण योजनेतंर्गत ट्रॅक्टर, व मळणी यंत्र या शेती अवजारांचे पूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करून लाभार्थ्यांना चाबी देऊन वितरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी परंपरागत शेती न करता यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त अवलंब करून आधुनिक पध्दतीने शेतीव्यवसाय करून उन्नती साधावी असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी पर्यवेक्षक वाय ए बोरसे, कृषी सहाय्यक सतीश पाटील यांच्यासह लाभार्थी उपस्थिती होते यात अनिल लोटन पाटील रा डांगरी व बळीराम पाटील रा मूडी प्र अ या दोन लाभार्थी ट्रॅक्टर व छोटू पाटील रंजाने यांना एक मळणी यंत्र देण्यात आले. ट्रॅक्टरसाठी 1 लाख रुपये अनुदान तर मळणी यंत्रासाठी 63 हजार अनुदान देण्यात आले असून ही निवड लॉटरी पध्दतीने झाली आहे.