पारोळा (प्रतिनिधी) – येथील दर्पण पत्रकार संघटने कडून दि 1 रोजी प्रिंट माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनिधींना विमा कव्हरेज मिळावे तसेच धरणगाव येथील पत्रकार शरद बन्सी यांच्या वारसांना 50 लाख रुपयाची मदत मिळावी यासाठी निवेदन दिले गेले . यावेळी तहसीलदार अनिल गव्हांदे, प्रभारी मुख्याधिकारी विकास नवले ,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय नावरकर पत्रकार भिका चौधरी , सचिव अभय पाटील संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब भोसले, सदस्य संजय पाटील, रमेश जैन ,अशोक ललवाणी ,प्रतीक मराठे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अनिल गव्हांदे यांनी प्रिंट मीडियाने कोरोना काळात प्रशासन व समाजास अनमोल सहकार्य देऊन वस्तुनिष्ठ माहिती दिल्याचे सांगून सदर निवेदना बाबत आपण पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
या अगोदर पारोळा दर्पण पत्रकार संघटनेची बैठक होउन यात कै शरद बन्सी धरणगाव यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन संघटने कडून सर्व प्रिंट मीडिया प्रतिनिधी यांचा सामूहिक विमा करण्याबाबत एक मत झाले यावेळी वरील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.







