• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात 52 कोरोनाबाधित, पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर : राजेश टोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in महाराष्ट्र
0

राज्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये आज आणखी तीन जणांची भर पडली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून या ते काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, डिस्चार्जच्या मार्गावर
कोरोनाबाधित जे रुग्ण दाखल झाले होते, उपचारानंतर या पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या पाच जणांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचाच अर्थ रुग्ण बरा होतो. मात्र त्यांना सात ते आठ दिवस विलगीकरणात राहावं लागेल, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण लॅब टेस्टिंगची संख्या दिवसाला 2400 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपण सहा लॅबमध्ये तपासणी करत आहोत, येत्या काही दिवसात ही संख्या 12 होईल, असं त्यांनी सांगितलं.

जनता कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद द्या : राजेश टोपे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यातील जनतेने 100 टक्के प्रतिसाद द्यावा असं राजेश टोपे यांनी म्हटलं. ते म्हणाले की, “पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. त्यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. हा योग्य निर्णय आहे. लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्फ्यू पाळायला हवा. तसंच गर्दी कमी व्हावी म्हणून यासाठी आम्ही दुपारी साडे बारा वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधणार आहे. तेव्हा महत्त्वाचे निर्णय जाहीर करणार आहोत.”

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. आम्ही वर्षा बंगल्यावरुन चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील समस्या आम्ही पंतप्रधानांसमो मांडणार आहोत. ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या
पुणे – 21
मुंबई – 12
नागपूर – 4
यवतमाळ – 3
कल्याण – 3
नवी मुंबई – 3
रायगड – 1
ठाणे – 1
अहमदनगर – 2
औरंगाबाद – 1
रत्नागिरी- 1


 

 

Previous Post

वृद्ध लाभार्थ्यांकारिता रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे ५० खुर्चीचे वाटप

Next Post

अखेर निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर निर्भयाच्या चारही आरोपींना फासावर लटकावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon