रावेर ( प्रतिनिधी) – रावेरकडून मध्य प्रदेशात चंदन व कडु लिंबाच्या लाकडांची तस्करी करणा-यांचा डाव यावल वनविभागाच्या फिरत्या भरारी गस्त पथकाने मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हाणुन पाडला .यामुळे लाकुड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुप्त माहीती मिळाल्याने यावल वनविभागाचे फिरते पथक खानापुरनजिक लाकडाच्या ट्रकाची झाडा-झडती घेत असतांना त्यांना काही मोटरसायकस्वारांवर संशय आला त्यांची वनविभाच्या या पथकाने कसून चौकशी केली . त्यानंतर त्यांनी जवळच्या ज्वारीच्या शेतात लपवून ठेवलेले ४० किलो वजनाचे २३ घनफुट चंदनाचे सुमारे ४० हजार रुपये किमतीचे मौल्यवान लाकुड काढून दिले.
दरम्यान घटनास्थळा वरुन चंदनचे लाकडे काढून यावल वनविभाच्या ताब्यात देऊन घटनास्थळावरुन गस्त पथकाच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाले . लिंबाच्या लाकडांचा ट्रक पकडला
दरम्यान यावल वन विभागाचे फिरते गस्त पथकाने चंदन पकडण्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास खानापुर नजिक ट्रक (एम एच १९ झेड ६८३५ ) जप्त केला होता त्या ट्रकामधून २४ हजार रुपये किमतीचे १८ टन वजनाचे १२ घनमीटर जळावू लाकुड ताब्यात घेतले असून ट्रक वनविभाच्या रावेर डेपोत जमा केले आहे.
सायंकाळच्या सुमारास लिंबाच्या लाकडांच्या ट्रकवर तर रात्री दोनच्या सुमारास चंदनावर यावल वन विभागाच्या भरारी पथकातील वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल एस. आर. पाटील, एन . व्ही . देवरे, पोलिस शिपाई एस. आर. तडवी, वाय. डी. तेली यांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईच्या ठिकाणापासून रावेर वन विभागाचे चेकपोस्ट हाकेच्या अंतरावर आहे.परंतु त्यांचे जाणून-बुजुन याकडे दुर्लक्ष असते, अशी शंका आधीपासून लोक बोलून दाखवत आहेत .
तालुक्यातुन लाकडांची मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये विनापास तस्करी होते रावेर वनविभागाचे खानापुर नजिक चेकपोस्ट असून यावर आळा घालण्याची जबाबदारी वनक्षेत्रपालांनी नाकेदार यांच्यावर दिली असतांना नाकेदार यांच्या आशिर्वादामुळेच वनविभागाच्या चेकपोस्टवर लाकडांच्या ट्रकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.