गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी)- नदया म्हणजे मानवी जीवन सुखी करण्याचा मानस असल्याने नदी ही मानवाची जीवनाची जीवनदायी असल्याने नदयामुळेच खऱ्याअर्थाने शेती व शेतकरी,मानवाचे जीवन समृद्ध झाले आहे़ म्हणून सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा दिवस गेल्या काही दिवसापासून भारताबरोबर काही विदेशात देखील जागतिक नदी दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने येथे नुकतेच गिरणा नदीचे खणानारळांनी व वस्त्र (साडी)अर्पण करून पूजन करण्यात आले.
गिरणा नदी ही गुढे गावासह परिसरातील अनेक गावांची व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी मानली जाते म्हणून ही गिरणा माई(मैया)चे ऋण फेडण्यासाठी येथील युवा शेतकरी तथा युवा सेनेचे तालुकाउपप्रमुख राहुल भाऊसाहेब पाटील यांनी व सुमीत पवार,विवेक कोष्टी,सोमनाथ माळी यांनी जागतिक नदी दिवस निमित्त गिरणा मातेच्या चरणी लीन होऊन खणानारळांनी ओटी भरून पूजन केले.पर्यावरण व जलसंवर्धन करीता देशातील नदया वाचविणे गरजेचे आहे असा आशावाद या तरुणांनी व्यक्त करून संकल्प केला आहे.







