भडगाव (प्रतिनिधी)- भडगाव-नाचणखेडा रस्ता तात्काळ मंजूर करून नव्याने तयार करण्यात यावा या मागणीचे निवेदन आ. किशोर पाटील व तहसीलदार माधुरी आंधळे यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
भडगाव ते नाचणखेडा या दोन गावांना जोडणारा हा दोन तालुक्यातील रस्ता आहे. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे चिकमय व खड्ड्यंनीयुक्त झाला आहे. रस्त्यावर येण्या-जाण्यासाठी जागा नसून वाहने मध्येच सोडावी लागत आहे. बैलगाडी जाईल असा रस्त्या नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातच पडून आहे. दोन दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांचा शेतात काढलेला मका, उडीद, चवळी जेमतेम पावसापासून वाचली होती. ती घरी आणण्यासाठी शेतात एकत्र जमा करून ठेवण्यात आली. मात्र रिक्षा रस्त्यात आडल्याने व बैलगाडी ही शेतापर्यंत येत नसल्याने या शेतकऱ्यांचा माल शेतातच सडून खराब होत आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
यावेेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग विषयी नाराजी व्यक्त करण्यात अली. शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व नाचणखेडा भडगाव रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. शेतकऱ्यांचे हे गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावे अशी मागणी यावेळी शेतकरी नरेंद्र पाटील, शेख शकील शेख बाबू, सुभाष ठाकरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शब्बीर बेग मिर्झा, नंदू चौधरी, आत्माराम महाजन, श्याम चौधरी, राजेंद्र चौधरी, वसंत पाटील, नामदेव महाजन, शांताराम माळी, अनिल पाटील, नामदेव महाजन, विनोद आचारी, अहमद मिर्झा, धोंडू सुका पाटील, काशिनाथ आचारी आदींनी केली आहे.