अमळनेर (प्रतिनिधी) – येथील तळवाडे गावाची दि.01/04/2020 रोजी धनदाई माता ग्रामदेवतेची सालाबाद प्रमाणे यात्रा भरत असते, सदर यात्रेस साधारण 4 ते 5 हजार भाविक व तमाशाप्रेमी येत असतात त्यामुळे कोरोना च्या पार्श्वभूमीवर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सदर यात्रा स्थगीत करणेबाबत आदेश पारित केले आहे.
मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील दि.16/03/2020 चे आदेशान्वये रोग प्रतिबंधात्मक कायदा 1997 अन्वये मोठया प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमुन देण्यासाठी, संपुर्ण जळगाव जिल्ह्यात मध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस धार्मिक व सांस्कृतीक
कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यादीवर दि. 16/03/2020 ते दि.31/03/2020 या कालावधीसाठी बंदी आणण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत कोरोणा व्हायरसची त्रिव्रता आजुन कमी झालेली नाही त्यामुळे मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचे दि.16/03/2020 चे आदेशात मुदत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दि.31/03/2020 पर्यंत बंद असल्याने तहसीलदार मिलींद वाघ यांनी सदर आदेशानुसार मौजे तळवाडे येथील यात्रा ही दि 01/04/2020 रोजी सदर आदेशाचे समाप्तिचे दुसऱ्या दिवशी व पुढील आदेश होईपावेतो सुरु करण्यात येवू नये. तसेच ग्रामपंचायत तळवाडे यांनी सदर यात्रेसंदर्भात कोणतेही दुकान, तमाशा, पाळणे व इतर खेळणे इत्यादींना कोणतीही परवानगी देणेत येऊ नये. तथापि, जत्रा, यात्रा, उरुस इ. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरु इत्यादीना विधीवत पुजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही, अश्या आशयाचे आदेश पारित केले आहे.