जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळवाडी शिवारात असणार्या हातभट्टीच्या अड्डयांवर आज तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने धडक कारवाई करून मद्याच्या रसायनासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने आज पहाटे अवैध दारूविक्री करणार्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत देऊळवाडे येथील रहिवासी असलेल्या तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात येवून त्यांंच्या ताब्यातून ८०,२५० रुपयांचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ६० लीटर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या रसायनाचाही समावेश आहे.
ही कारवाई तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अरुण सोनार, पोलिस नाईक चेतन पाटील, विलास शिंदे, संजय चौधरी यांनी केली आहे.