51 रक्त दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला
रावेर (प्रतिनिधी) – मागच्या आठ महिन्यांपासून संपूर्ण राज्यात आणि देशात कोरोनाने हाहाकार चालू आहे, कोरोना या शिघ्रसंसर्गजन्य आजाराने हजारो लोकांचे बळी घेतलै. यात सर्वात जास्त 60 वर्षांवरील जेष्ठ लोकांचे बळी गेलेच पण आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा धडधाकट तरुण वयातीलही अनेक जणांचे बळी कोरोनाने घेतले असल्याचे तुम्ही आम्ही रोज पहत़ोय.
परंतु आज एका दुसऱ्या बाजूला जो धोका वाढतो आहे त्या धोक्यावर तुम्हा सर्वांच लक्ष वेधणार आहे.
क़ोरोनाने लोक एकमेकांपासून दूर झाली, लॉकडाऊन मुळे आवाजावी बंद झाली. अशा विविध कारणांमुळे आजच्या तारखेला सरकारी रक्तपेढया, खाजगी रकतपेढ्यावर केवळ आणि केवळ 30 टक्केच रक्त उपलब्ध असल्याचे समोर येत आहे, विवीध आजारांवर, विविध रोगांवर, विविध अपघातात, महीला भगीनींच्या डिलीव्हरी वेळी, विविध सर्जरींवेळी रक्ताची प्रचंड मागणी असते, परंतु रक्त संकलण व उपलब्धता नसल्याने क़रोणाने जेवढे मृत्यू होत आहेत तेवढेच मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याच गोष्टीचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, सरचिटणीस मा.शिवाजी गर्जे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल व फ्रंटल संघटनांचे राज्य समन्वयक सुहास उभे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी 27 सप्टेबर 2020 रोजी रक्तदानमहाअभियान शिबीराचे आयोजन केले होते, सदरील रक्तदानमहाअभियान शिबीर एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातुन राबविण्यात आले.
प्रत्येक जिल्ह्यातुन जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात होते,तर जळगाव जिल्ह्यातून या पार्श्वभूमीवर रावेर राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या वतीने आयोजित रक्तदान महाअभियान शिबीरात 51 दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला तर डॉ नितीन भारंबे सह गोदवरी हाॅस्पिटल्स जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित दि 27 रोजी,वार रविवार, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजता, रविंद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा पदवीधर संघांचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक पाटील, उपाध्यक्ष जळगाव जिल्हा राष्ट्रवादी
विनोद तराळ, जिल्हाध्यक्ष किसान सभा सोपान पाटील, ऐशवरी ताई राठोड प्रदेश सरचिटणीस व्ही जे एन टी सेल
राष्ट्रवादी , माजी नगराध्यक्ष रावेर (गोटू शेठ,) रमेश महाजन, रमेश पाटील, माजी,जि,प सदस्य, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, माजी युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, घनश्याम पाटील, योगेश महाजन, राजेश महाजन,चेतन महाजन, सौरव सपकाळ, गौरव महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत .
तसेच मयूर महाजन, ललित महाजन, प्रशांत जंजाळकर, ज्ञानेश्वर महाजन, भुषण महाजन, कान्हा कावडकर
दुर्गेश महाजन,शुभम सावकर, निखिल ताठे, योगेश पाटील ,संदिप पाटील, शेख सर ताअध्यक्ष, संदिप हिवाळे सा. न्याय, राजू नाईक ओबीसी, ईश्वर चोरडिया विजय पाटील, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नेतेही उपस्थित होते.
यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी रक्तदान केले, तर निळकंठ चौधरी, तालुकाध्यक्ष रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी सचिन पाटील तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी, दिपक पाटील,प.स.सदसय रावेर, योगेश पाटील ,पं,स . सदस्य रावेर, उपाध्यक्ष लक्ष्मण मोपारी, शे मेहमूद शे मण्यार , रावेर शहराध्यक्ष, राष्ट्रवादी प्रणित महाजन, युवक रावेर शहराध्यक्ष , राष्ट्रवादी यांच्या सहकार्याने किरण साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष रावेर पदवीधर संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या परिश्रमातून रावेर येथे रक्तदान महाअभियान शिबिर यशस्वी पणे पार पडले.