जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मुख्य घाणेकर चौकात असलेल्या गांधी मार्केटमध्ये शनिवारी २६ रोजी मद्यपींनी हैदोस घातल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे यात एका अल्पवयीन तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. शहर पोलीस स्थानकापासून काही अंतरावरच हि घटना घडली.

भावाला शोधण्यासाठी निघालेल्या नवाज शेख अलाउद्दीन शेख [वय-१७] अल्पवयीन मुलाच्या अंगावर चार ते पाच जणांनी दारूच्या नशेत पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शहरातील गांधी मार्केटमध्ये सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधत तक्रार देण्यात आली आहे.
शहरातील भिलपूरा परिसरातील रहिवासी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लहान भावाला शोधण्यासाठी गांधी मार्केट मध्ये गेला. गांधी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर चार ते पाच जण दारू पित होते. त्यावेळी तरुण त्या ठिकाणी भावाला शोधण्यासाठी आला पोहोचला. त्या चार ते पाचही जणांनी दारूच्या नशेत विनाकारण तरुणाचा हात पकडला. त्याच्या खिश्यातील १५ रूपये हिसकावून घेतले. तसेच, त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. नवाजने हात झटकुन पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या मद्यपींनी तरुणाला पकडले आणि एकाने अंगावर पेट्रोल टाकल्याचे तरुणाच्या
नातेवाईकांनि सांगितले. त्याला पेटविण्यासाठी मद्यपी माचीस शोधत होते. त्यावेळी तरुणाने मद्यपीच्या हाताला जोरदार झटका देत घरी पळत गेला. त्याच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात चार ते पाच जणांविरोधात तक्रार दिली आहे.







