जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील कासोदा शिवारात राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने टाकलेल्या धाडीत बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उध्वस्त केला आहे. यात ३ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक होत आहे.
कासोदा शिवारातील कासोदा-कनाशी रस्त्याला लागून असलेल्या नाल्याला लागून मोकळ्या जागेत राहुल अनिल चौधरी रा. कासोदा ता. एरंडोल हा बनावट मद्य बनवून विकत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव विभागाला मिळाली. त्यानुसार अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील प्रभारी निरीक्षक एस.एफ. ठेंगडे , दुय्यम निरीक्षक ए.एस.पाटील, जवान एन.पी.पाटील, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, आर.पी. सोनवणे आदींच्या पथकाने कासोदा शिवारात कारवाई केली. यात टाटा कंपनीचे एस लहान टेम्पो, वाहन क्र. एम एच १९ बी एम ५१३५, बनावट मद्य निर्मितीसाठी लागणारे मद्यार्क, रिकाम्या बाटल्या आदी १४ बॉक्स बनावट देशी मद्य असा एकूण ३ लाख ६९ लाख ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मद्यार्क कुठून आणले होते व तयार बनावट मद्य कोठे विकले जाणार होते याचा तपास प्रभारी निरीक्षक ठेंगडे करीत आहेत.