मुंबई (वृत्तसंस्था) – सुप्रसिद्ध पार्श्वगायक ‘एस.पी. बालसुब्रमण्यम’ यांचे वयाच्या 74 व्या निधन झाले आहे. कोव्हिड 19 च्या आजाराने त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी कोरोनावर मात करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांची तब्येत मागील काही दिवसांमध्ये खालावत होती. अखेर त्यांनी आज (दि.25) चैन्नई मध्ये खाजगी रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.
आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांच्या उत्कृष्ट गायकी कारकीर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक ‘एस.पी. बालसुब्रमण्यम’ यांचे वयाच्या 74 व्या निधन झाले आहे. कोव्हिड 19 च्या आजाराने त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी कोरोनावर मात करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांची तब्येत मागील काही दिवसांमध्ये खालावत होती. अखेर त्यांनी आज (दि.25) चैन्नई मध्ये खाजगी रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.
आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे. बालासुब्रमण्यम यांना त्यांच्या उत्कृष्ट गायकी कारकीर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.