रावेर (प्रतिनिधी) – मागच्या आठ महिन्यांपासून संपूर्ण राज्यात आणि देशात कोरोनाचा हाहाकार चालू आहे. यात सर्वात जास्त ५० वर्षांवरील जेष्ठ लोकांचे बळी गेले. यासाठी रक्ताचा होत असलेला तुटवडा पाहता रविवारी २७ सप्टेंबर रोजी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी १० वाजता राज्यव्यापी रक्तदान महाभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस शिवाजी गर्जे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेल व फ्रंटल संघटनांचे राज्य समन्वयक सुहास उभे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी 27 सप्टेबर रोजी रक्तदान महाअभियान शिबीराचे आयोजन केले आहे. महाअभियान शिबीर एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातुन राबविण्यात येईल. यात उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग ) प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी राबवणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातुन जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. या रक्तदान महाअभियान शिबीरात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतिश पाटील, गफार मलिक, विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील, संजय गरूड, माजी आमदार अरुण पाटील, विनोद तराळ, सोपान पाटील, रमेश पाटील, राजेश वानखेडे, राष्ट्रवादी पदवीधर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल पाटील भरोसे यांच्या उपस्थिती राहील.
तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष विलास ताठे, सचिन पाटील, दिपक पाटील, योगेश पाटील, विनोद चौधरी, सुनिल कोंडे,शे मेहमूद शे मण्यार, प्रणित महाजन यांनी आवाहन केले आहे.