जळगाव (प्रतिनिधी) – येथील छावा संघटनेतर्फे जिल्हा पोलीस दलाची सूत्रे नुकतीच स्वीकारणारे डॉ. प्रवीण मुंडे यांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ. प्रवीण मुंडे यांनी नुकतीच जिल्हा पोलीस अधिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्यात असणारे डॉ. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. या पार्श्वभूमिवर, आज छावा मराठा युवा संघ या संघटनेच्या पदाधिकार्यांनी डॉ. मुंडे यांना संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अमेय कुलकर्णी, महानगर प्रसिध्दी प्रमुख किरण ठाकूर आणि शांतता समितीचे सदस्य हरीश्चंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती.