मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत.
याच पुराव्यांच्या आधारे आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार,रकुल प्रीत सिंहला ड्रग्स केसमध्ये समन देण्यात आला होता. पण रकुल उपलब्ध नाही. तसेच कोणत्याही प्रकारचं उत्तर तिने एजन्सीला दिलेलं नाही.
एनसीबी अधिकारी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, रकुल प्रीत सिंहला समन देण्यात आला होता आणि तिला वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात फोनचाही समावेश आहे. पण तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. काहीही उत्तर मिळालं नाही. रकुल फोन उचलत नाहीये. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, रकुल सध्या हैदराबादमध्ये आहे.
रकुल प्रीत सिंहसोबतच सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांच्या घरी समन पाठवण्यात आला होता. या दोघींची चौकशी केली जाईल. रकुल प्रीत सिंह जर एनसीबीकडे चौकशीसाठी आली नाही तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी ही औपचारिक माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.