मुंबई (वृत्तसंस्था) – भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळली दुर्घटनेवरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘उद्धव ठाकरे, संजय राऊत.जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते.
ती पुढे म्हणाली, तुमच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप लोक गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित … कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.