जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मोहाडी रस्त्यावरील बाबा गेलाराम आश्रमाजवळ महिलेला तिच्या मुलासह पती आणि इतर तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन नगर येथील विवाहित महिला हि त्यांच्या आई व लहान मुलासह वास्तव्यास आहे. रविवारी २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता महिलेचा भाऊ संभाजी सपकाळे याने फोन करून सांगितले की, माझे पाहुणे हे मला शिवीगाळ करीत आहे. त्यानंतर सदर महिला मुलासह मोहाडी रोडवर गेली. तेथे पती आनंद डिगंबर सोनवणे यांना तुम्ही माझ्या भावाला शिवीगाळ का केली असा जाब महिलेने विचारला, याचे वाईट वाटून आनंदा सोनवणे याच्या सोबत असणाऱ्या गोपाळ काशिनाथ सोनवणे याने लाकडी दांडक्याने उजव्या हातावर मारून दुखापत केली.
तसेच आनंदा सोनवणे यानेही मारहाण केली. आबा एकनाथ सोनवणे, पिंटू जनार्दन सोनवणे यांनी शिवीगाळ केली. तसेच महिलेचा लहान मुलगा यालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील, लुकमान तडवी करीत आहेत.