नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – आंतराष्ट्रीय संबंधावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मैत्रीशिवाय शेजारी राहणे धोकादायक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राहुल गांधी चीन, करोना आणि अर्थव्यवस्थेवरून सातत्याने मोदींना लक्ष्य करत आहे.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने अनेक दशकांपासून बनविलेले आणि पोषण केलेले संबंधाचे जाळे मिस्टर मोदीजींनी नष्ट केले आहे. मैत्रीशिवाय शेजारी राहणे धोकादायक आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी राहुल गांधी हे त्यांना घेऊन अमेरिकेला गेले होते. तथापि, मंगळवारीच सकाळी ते दोघेही मायदेशी परतले आहेत. सध्या संसदेत शेतीविषयक विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्यांच्या परतण्यामुळे आता कॉंग्रेस व मित्र पक्षांना बळ मिळणार आहे. तथापि आता त्यांना उर्वरित कामकाजात सहभागी होता येणार आहे. 24 सप्टेंबरपासून कॉंग्रेसने अन्य विरोधीपक्षांच्या मदतीने शेतीविषयक विधेयकांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचे नेतृत्वही राहुल गांधी यांना करता येणार आहे.