वडती ता. चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व भारतीय युवा मोर्चा यांच्या वतीने चोपडा नायब तहसिलदार यांना अभिनंदन ठरावा विषयी नुकतेच पदधिका-यांच्या व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
येथील केंद्रीय अधिवेशनात शेतकरी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० व शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक २०२० मंजुर झाले म्हणून प्रधानमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांचे अभिनंदन ठराव बाबत
मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा नेतृत्वाखाली काल कृषीविषयक दोन विधेयक मंजूर झाली.मा.केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर व केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ते विधेयक लोकसभा व राज्यसभेत मांडले व आवाजी मतदाने मंजूर झाले. शेतकर्यांच्या जिवनातला हा ऐतिहासिक निर्णय आहे.
शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे. शेतकर्यांच्या पदरात त्यांच्या घामाच्या पुर्ण दाम मिळणार आहे. आजचा हा ऐतिहासिक दिवस असुन शेतकरी उत्पादन, व्यापार, आणि वाणिज्य विधेयक २०२० व शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक २०२० मंजुर झाले त्यामुळे आज दिनांक २२/०९/२०२० रोजी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, व भारतीय किसान मोर्चा चोपडा तालुका व शहर यांचा वतीने नायब तहसिलदार ईखनकर यांना मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय कृषीमंत्री मा.नरेंद्रजी तोमर व केंद्रीय राज्यमंत्री मा.पुरुषोत्तम रुपाला भारत सरकार यांच्या अभिनंदन ठरावासंदर्भातर निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष व नगरसेवक गजेंद्र जैसवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश लक्ष्मण पाटील,सरचिटणीस डॉ.मनोहर बडगुजर,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे, तालुका कार्यालय मंत्री मोहित भावे, चिटणीस विवेक गुर्जर, युवा मोर्चा सरचिटणीस अमित तडवी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. व उपस्थित होते.








