पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,कोरोना योद्धयांचा सत्कार
जळगाव [ प्रतिनिधी] – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार २१ सप्टेंबर रोजी आव्हाणे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजनासह कोरोना योद्धयांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
अपंग व्यक्तींना धान्य व अंगणवाडीला साहित्य वाटप सुद्धा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार ना . पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. गावठाण परीसरात प्लेव्हर बाॅक्स व सुशोभीकरणासाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला.
तसेच दलीतवस्ती सुधारणाअंतर्गत काॅक्रेटीकरणाचे उदघाटन, जि.प.मराठी शाळा संरक्षण भिंत बांधकाम भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी,पं.स.अँड हर्षल चौधरी, आरोग्य दुत राजेंद्र चव्हाण माजी सभापती जि.प.,आव्हाणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र लहासे, सरपंच वत्सलाबाई मोरे, उपसरपंच छगन पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.