वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) –चोपडा तालुक्यातील वढोदा येथे अनवर्दे -वढोदा व वढोदा -विटनेर या रस्त्या “राजस्व अभियान अंतर्गत” शिव रस्ता मोकळा करणे या माध्यमातून गावातील शिवारातील गट क्रमांक गट नंबर २०९ पासुन गट क्रमांक २२७ पर्यंत अदांजे 1:5 कि.मी. शेत रस्ता दुरूस्तीसाठी 7500 / रू-80,000/ ऱू. पर्यंत खर्च अपेक्षीत आहे. साधारण 8 ते 10 ट्रँक्टर 3/4 दिवस काम चालणार आहे. हा सर्व खर्च लोकसहभागातून केला जाणार आहे . रस्ता मोकळा करून रुंद करून परिसरातील शेतक-यांनी रोजच्या शेतात ये-जाला होणा-या त्रासावर मात करून समस्या सोडवली आहे. सदर योजनेचा लाभ होणारे क्षेत्र 160 ते 170 एवढ्या शेतक-यांना होणार आहे.146 हेक्टर वरील शेती मालकांना फायदा होणार आहे.
यामुळे येथील परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल ने- आण करणे कामी बैलगाडी जोडी व वाहनांचा रस्ता तयार होवून फायदाच होइल. रस्ता हा शेती साठी किती फायदयाचा आहे. याच महत्व शेतक-यांना कळत!
म्हणून शेत रस्त्याला लागून असले तर त्याला सोन्या सारखी किमंत होते. असंख्य गावातील शेतजमिनीला सोन्याची किंमत मिळत असते. मुख्य रस्त्यालगतच्या जमिनी शहरापासून पाचपन्नास किलोमीटरवर असल्या तरी त्या चढत्या भावाने घेणारे व्यापारी, कारखानदार, नोकरदार आहेत. शेतजमिनीला रस्ता नसेल तर कितीही कमी किंमतीत घ्यायला कोणी धजावत नाहीत. ही किमया रस्त्याची आहे. खेड्यात पिकणारा माल थेट बाजारात आणायचा झाला तर, त्याला त्या-त्या हंगामात तो शेताबाहेर काढणे मुश्कील झालेले आहे. गावातून जाणाऱ्या पाणंदीतून चार-सहा महिने माणसानांच काय, तर गुरांनादेखील जाता येत नाही. तिथे तो शेतातली रास घरापर्यंत तरी कशी आणू शकेल. असे पन्नास टक्केपेक्षा जास्त क्षेत्र राज्यात आहे की जिथे पावसाळ्यातले चार महिने व हिवाळ्याचे दोन तीन महिने कसलेही वाहन, साधी बैलगाडी चालत नाही. सहा आठ महिने गुरे-ढोरे शेतात किंवा घरीच बांधावी लागतात. असे आडवळणाचे रस्ते नसणारे शेत कितीही भारी असले तसेच तिथे पाण्याची सोय असली तरी तो शेतकरी बागायती पिके घेऊ शकत नाही. एखाद्या शेतकऱ्यांने रस्ते नसलेल्या शेतीत फळे-भाजीपाला घेतलाच तर तो शेतमाल बाजारापर्यंत नेईपर्यंत खराब होऊन जातो. यामध्ये शेतकऱ्याबरोबर गावाचे अन् देशाचेही नुकसान होते.
जुन्या काळात शेती भरमसाट, अन् कसणारे कमी होते. रस्त्यासाठी त्याची ओळभर जमीन वाया गेली तरी त्याला काही वाटत नव्हते. त्यामुळे सहसा कोणी आडकाठी आणत नसे. म्हणून गावागावातून सर्व दिशाने जाणारी, एकमेकांना जोडणारे गावरस्ते, पाणंदी शेतकऱ्यांच्या जमिनीतूनच गेलेली दिसतात. पूर्वी एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्तीही होती.
आज फार कमी दिसते. त्यासाठी एकीचे बळ असणे महत्वाचे आहे . ते आहे म्हणून सर्व शेतकरी समविचाराने व एकजूटीने रस्त्याच्या कामाला लागल्याने कांमास प्रारंभ करून लवकरच पुर्णत्वास येईल. सदर शेत रस्ता दुरुस्तीसाठी गोकुळ पाटील, शेखर पाटील, गोरख पाटील, शिवाजी पाटील, मगन पाटील, आधार सोनगिरे, वासुदेव पाटील यांनी मेहनत घेतली,
तर तलाठी वंदना कोळी, तलाठी संतोष कोळी, मंडळ अधिकारी आर. आर. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तर
या कामांच्या बाबतीत ठाम विश्वास येथील शेतकऱ्यांमध्ये दिसला.