जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध भागातून आठ दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ दुचाकींसह अटक केली आहे. या गुन्हेगारावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी की, जिह्यातील भडगाव आणि धरणगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात मोटारसायकली चोरून नेल्याप्रकरणी संशयित आरोपी राहुल माधवराव वाघ (रा.भडगाव) आणि रविंद्र तुकाराम चौधरी (रा.पारोळा, ह.मु.पाचोरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार होते. दोघांनी एरंडोल, पाचोरा आणि पारोळा तालुक्यातून एकुण 3 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या 8 मोटारसायकली चोरून नेल्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन्ही भामट्यांना चोरी केलेल्या दुचाकींसह अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षिक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक तयार केले. त्या पोहेकॉ राजेश मेढे, संजय हिवरकर, दत्तात्रय बडगुजर, रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, किरण चौधरी, इंद्रिस पठाण, राजेंद्र पवार यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील दोन्ही आरोपी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील आठ दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.