महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घेतली भेट

अमळनेर (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप पीक काढणीला येण्याच्या वेळेस अतिरुष्टी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मुगाच्या शेंगा त्यांना कोंब फुटले तसेच उडीद पिकाचे सुद्धा नुकसान झाले तर कापणीला आलेली तीळ पिकाची काढणी नरम होऊन जमिनीकडे झुकलेली सर्व तीळ जमिनीवर सांडले गेली सोयाबीन पिकांचे सुद्धा नुकसान झाले असेच सर्व खरीप पिकांच्या बाबतीत झाले आणि शेतकऱ्यांच्या तोंडात येणारा घास पावसाने हिरावून घेतला त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे खरीप पिकांवर खर्च करून जमिनीचे सुद्धा उत्पन्न आलेले नाही अशा परिस्थितीचे काही तालुक्यात पंचनामे झाले आहेत परंतु संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावे व खरीप पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे.







