मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. आज उद्धव ठाकरेंनी आज राज्याच्या जनतेला संबोधताना त्यांनी जनतेचे आभार मानले. त्यासोबत सरकारी यंत्रणेवर जास्त ताण आणू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
आपण सध्या जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही. त्यामुळे धीर नका सोडू कारण आपली यंत्रणा विषाणूषी दोन हात करायचे आहेत. विषाणू धर्म नाही पाहत त्यामळे आपण एकजुटीने रहायला हवं, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.आपली मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढत आहे. सीमेवर ज्याप्रमाणे जवाण लछत असतात त्याप्रमाणे डॉक्टर, नर्स, वॉर्डबाय सर्वजण आपल्या परीने लढत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, कोरोना हे परदेशी संकट आहे. त्यामुळे दिलेल्या सूचनांचं पालन करा. सध्या हे संकट हे वॉर अगेन्स्ट व्हायरस आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जनतेला कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं.