अमळनेर (प्रतिनिधी) – येथील श्री मंगळ ग्रह मंदिर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासकीय आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. मंदिर उघडण्याबाबत पुढील शासकीय आदेश प्राप्त होई पर्यंत मंदिर , दर्शन व अभिषेक बंद राहतील, असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.