दोन अभियंत्यांच्या समन्वयाअभावी मोबाईल सेवा प्रलंबित
वडती ता. चोपडा (प्रतिनिधी)
गेल्या सहा महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील चौगाव या गावी जीओचे टॉवर बसवण्यात आले. संबंधीतांच्या आडमुठे धोरणामुळे मोबाईल सेवा सुरू होत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एका तरूणांने टॉवर वरती चढून मोबाईल सेवा सुरू करण्याची मागणी केली.
या गावात कुठल्याच कंपनीचे नेटवर्क येत नसल्यामुळे ग्रामस्थांना महत्वाच्या कामांसाठी संपर्क होवू शकत नाही अन् करू शकत नाही. मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातातले साधन झाले आहे. घराघरात दैनदिन जीवनात मोबाईलने आपले स्थान घरातील सभासदाप्रमाणे घेतले आहे. मोबाईल सिग्नलची जेव्हा अडचण येते तेव्हा आपण कंपन्यांना किती लाखोल्या वाहतो हे काही सांगायचे काम नाही. गावोगावी मोबाईल सेवा होवून गेल्या. अनेक कंपन्यानी यासाठी टॉवर उभारण्या केल्या. जेणे करून ग्राहकांना सेवा सुविधा उत्तम प्रकारे मिळाव्या,पण जिओ कंपनीने व विज वितरण कंपनीने या गावात सेवा काही दिली नाही. विज वितरण व जिओ चे अभियंता यांच्यात विज मागणी वरून व जोडणीवरून सुंदोपसुंदी सुरू आहे.
एकीकडे सरकारच्या धोरण डिजीटल इंडीयाचे आहे. येथे मात्र वेगळेच धोरण. येथील काही नागरीकांनी लासूर सबस्टेशनचे इंजि. टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता गावठानंच्या रोहीत्रावर लोड असल्यामुळे कनेक्शन देता येणार नाही.स्वतंत्र 10 एचपी चा नविन रोहीत्र जिओ कंपनीला घ्यावा लागेल. असे सांगितले. जिओ कंपनी म्हणते, गावठान वरून कनेक्शन द्या. अशा वादविवादाच्या दुवीदेत चौगावातील एका तरूणांने चक्क टॉवर वरती चढून तत्काळ मोबाईल सेवा सुरू करण्याची मांगणी केली होती. संपूर्ण गावातून संबंधीतांवर नाराजीचे सुर उमटत आहेत. जर मोबाईल टॉवरची सेवा त्वरीत सुरू नाही झाली तर ग्रामस्थ जिओ व विज वितरण च्या विरोधात मोठा निर्णय घेवू घेतील, असे ग्रामस्थांनी सांगितले.