जळगाव शहर आणि शनीपेठ पोलीसांची संयुक्त कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – विना परवाना व बेकायदेशी गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतूस आणि धारदार शास्त्रासह संशयित आरोपीला बळीराम पेठेतून आज अटक केली. त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनीपेठ व शहर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील अग्रीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बळीराम पेठ भागात राहणारा संशयित आरोपी विलास मुधकर लोट (वय-४०) यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी आज सायंकाळी बळीराम पेठेतील संशयित आरोपी विलास लोट याच्या घराची झाडाझडती घेतली असता ५ हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल, १ हजार ५०० रूपये किंमतीचे जिवंत काडतूस, ५०० रूपये किंमतीचा कोयता, आणि प्रत्येकी १ हजार रूपये किंमतीचे दोन गुप्त्या असा साठा आढळून आला. बेकायदेशीर व विनापरवाना शास्त्र बाळगल्याप्रकरणी संशयित आरोपी विलास लोट याला अटक करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जगदीश निकम करीत आहे.सदर हि कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम याच्या मार्गदर्शनाखाली शनी पेठ पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशन यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. यात शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, पोहेको विजय निकुंभ, पोहेकां महेंद्र पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, ओमप्रकाश पंचलिंग व महिला पोलीस शिपाई अल्का मोरे आणि शनी पेठ पोलीस ठाण्याचे पो.कां. दिनेशसिंग पाटील, अभिजित सैंदाणे, किरण वानखेडे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील या दोन पथकांनी ही कारवाई केली.