जळगाव (प्रतिनिधी) – शहरात शनिवारी १९ रोजी दुपारी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली, तसेच शहरातील खड्यांची पूर्ण वाट लागली असून बुजलेले खड्डे उघड झाले आहेत.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला वाहन धारकांना समोरचे देखील दिसेनासे झाले. यामुळे जनजीवन मोठ्याप्रमाणात विस्कळीत झाले होते. यामुळे शहरातील खड्ड्यांची वाट लागली. खड्डे चुकवतांना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागली. काही दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने मुरूम,मातीचा भराव, तसेच खडी टाकून शहरातील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व खड्डे मुसळधार पावसाने पुन्हा उघडे पडले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती विषयी मनपा प्रशासन आता काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.







