पती, पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी जळगावातील घटना ; दोघांविरोधात गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) -विवाहाच्या बंधनात अडकताना आयुष्यभर आपला पती आपले सरंक्षण करेल या विचारात पतीकडे जाणार्या पत्नीच्या मनात विचारही येऊ शकत नाही, अशी घाणेरडी व या नात्याला काळीमा फासणारी घटना जळगावात उघडकीस आली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी या नराधमाने मित्राकरवी आपल्याच पत्नीवर अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना. यात अखेर पत्नीच्या फिर्यादीवरून पती व त्याच्या मित्राविरोधात रामानंद नगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पत्नीने दिलेली फिर्याद अत्यंत धक्कादायक आहे..त्यानुसार धुळे येथील माहेरवासीनी असलेल्या महिलेचा वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायिकाशी विवाह झाला. त्यांना दोन मुलेही आहेत. तिच्या पतीच्या एका मित्राचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने पतीने अखेर मित्रासोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र आपण राहत असलेल्या परिसरात भाजीपाला विक्री करण्यास लाज वाटत असल्याने पतीने मित्राच्या भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी जिथे तो एकटाच राहत होता. त्यानुसार आम्ही 20 मे रोजी प्रल्हादनगर पिंप्राळा हुडको या घरात राहयला आलो. आम्ही सर्व एकत्रित राहत होतो. 5 जून रोजी माझे पती माझ्याजवळ आले व म्हणाले तू माझ्या मित्रासमोर कपडे बदलत जा म्हणजे त्याचा आपल्याला व्यवसायात फायदा होईल, मात्र, मला ते मान्य नव्हते. मी त्यांना नकार दिला. यावर त्यांनी मला मारहाण केली तसेच यावर मी मुलांचा जीव घेईन व स्वतःही आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. या प्रकाराला घाबरून अखेर मी त्यांच्या मित्रासमोर कपडे बदलू लागली तो मला एकदम घाणेरड्या नजरेने बघायचा.
हे तर अत्यंत धक्कादायक
8 जूनला तर पतीने कहरच केला पत्नीजवळ आला व आज रात्री थेट मित्रासोबत झोप असे सांगितले. पत्नीने नकार दिला मात्र, पुन्हा तेच मुलांना झोपेतच मारून टाकेल व तुलाही संपवेल. मी तेव्हाही नकार दिला व त्यांना धक्काबुक्की केली. यावर पती घरातून निघून गेला व कोल्ड्रींक्स घेऊन आला. व हे पी टेंशन घेऊ नको, असे सांगू लागला कोल्डीक्स पिल्यावर मात्र आपल्याला चक्कर येऊ लागले. त्यातच पतीने व त्यांच्या मित्राने पकडून मला बाथरूममध्ये नेले तिथे पतीने मला जबरदस्ती पकडून ठेवले व त्याच्या मित्राने माझ्यावर अत्याचार केला. यानंतर कोणाला काही सांगितले तर मुलांना संपवून टाकेल अशी धमकी दिली. धमक्या सुरूच होत्या. शिवाय या सर्व प्रकाराचा व्हिडिओ केला असून कोणाला काही सांगितले तर तो व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेल, अशीही धमकी दिली. प्रकृती ठिक नसल्याने पतीने 17 जुलैला मला माझ्या माहेरी सोडले. माझ्या वहिनीने तिथे मला विचारण केली असता मी सर्व प्रकार सांगितले. त्यानुसार मी माझा पती व त्याचा मित्राविरोधात फिर्याद दिल्याचे या महिलेने फि र्यादीत म्हटले आहे. दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पती व त्याचा मित्र फरार आहे. याबाबत पोलीस दोघांचा शोध घेत आहे. पुढील तपास रामानंद नगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.