जळगाव (प्रतिनिधी) – येथील एलसीबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जामनेर येथून दुचाकी चोराला दुचाकीसह अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी . रोहोम यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने उघडकीस आणणे बाबत एलसीबी कर्मचारी यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
शुक्रवारी दि. 18 रोजी स्था. गु. शा. पथकातील कर्मचारी स.फौ.अशोक महाजन, पो.हे.का.सुरज पाटील, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पोकाँ रणजित जाधव अशांना जामनेर पोस्टे. येथील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल जामनेर शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या बातमीची खात्री झाल्यावर जामनेर शहरात जाऊन आरोपी शेख मुस्तकीन शेख सलीम रा. घरकुल बिल्डिंग, जामनेर यास ताब्यात घेतले. त्याना विचारपूस करता त्यांनी सदर मोटर सायकल जामनेर शहरातून मच्छी मार्केट परिसरातून चोरून मी स्वतः फिरवत असल्याचे सांगून त्याच्या जवळून काढून दिली. सदर संशयित आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी जामनेर पो. स्टे. च्या ताब्यात दिले आहे.