जळगाव (प्रतिनिधी) – कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही वेळाने कुलगुरू डॉ.पी.पी पाटील यांचे वाहन सुमारे दहा मिनिटे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी कुलगुरूंनी आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन जाऊ दिले.
विद्यापीठात शुक्रवारी १८ रोजी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या वाहनाचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर काही वेळाने कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, कुलसचिव डॉ.बी.व्ही. पवार घरी जाण्यास निघाल्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या समोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन अडविले. यावेळी कुलगुरूं राजीनामा द्या. अश्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांना विचारले की, पोलीस प्रशासनाला मारहाणीचे आदेश आपण दिले होते का?विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा आपण निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची राहील, असेही ते यावेळी कुलगुरू म्हणाले की, मारहाणीचा कुठलाही आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिला नव्हता. झालेली घटना नक्कीच चांगली नाही. घटना काय झाली ते मला लिहून द्या, विद्यार्थी कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यास काय कार्यवाही करावी ते पाहूया असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या घटनांमुळे विद्यापीठ परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी कुलसचिव डॉ.बी.व्ही.पवार, परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील, डॉ.ए.बी.चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.