वडती का चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील कठोरा या गावातील विद्युत लाईन पडल्यापासून विद्युत प्रवाह फिरण्याकामी जुन्या काळातच इलेक्ट्रिक लोखंडी इलेक्ट्रिक पोल हे पाणी, उन्ह, पावसामुळे खालून पूर्णतः गंजून जीर्ण व पडाऊ झालेले असून ते केव्हा पडतील याचा मुळीच भरवसा नाही व सदर पोल हवेमुळे किवा अचानक तुटून पडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित आणी सह वित्त हानी होईल आणि लोकांचे कधीही न भरून येणारे नुकसान ही होईल,

सदर बाब आम्ही तत्कालीन अधिकारी यांना लक्षात आणून दिल्या नंतर देखील विद्युत कंपनीच्या वतीने ठोस पाऊले उचलून ,सदर पोल काढून नवीन पोल आणि विद्युत तारा ह्या टाकण्यात आल्या नाहीत.तरी आतातरी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ते खराब झालेले विद्युत पोल आणि विद्युत प्रवाह खराब झालेल्या, झुकलेल्या व वाकलेल्या तारा तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात,आपण तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल ने आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी…
या विषयावर म.रा. वि. वि.कं. मर्यादित चोपडा भाग 2 कक्ष कुरवेल येथील मा.अभियंता श्री देवेंद्र महाजन साहेबाना मनसे रस्ते आस्थापना विभागाचे चोपडा तालुका अध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले त्यावेळी रवींद्र पाटील, दीपक विसावे, किशोर कुभार, ईश्र्वर परदेशी, सखाराम भिल, श्रीराम पाटील,साहेबराव पाटील,दर्शन सैदाने, ऋषिकेश पाटील,परशुराम पाटील, अभिजित पाटील, कांतीलाल कुंभार,भारत कुंभार, रामकृष्ण पाटील,राहुल पाटील, नथू धनगर, गुलाब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अधिकार पाटील,देवराम, पानपाटील, राजेंद्र बाविस्कर, रवींद्र कुंभार,अजय कोळी,संतोष पाटील, विनोद पाटील आदी महाराष्ट्र सैनिक उवस्थित होते..







