जळगाव (प्रतिनिधी) – येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी सॅनिटायझर व कोरोना स्क्रिनिंग उपलब्ध करण्यात आले आहे.यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे, विराज कावडिया अमित जगताप मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्क मंत्री संजय सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोरोना तपासणी करण्यासाठी एक मशीन उभारण्यात आली असून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जर शरीराचे तापमान 100 च्या वर जात असेल तर त्यांना तपासणी साठी पाठवले जात आहे. कोरोना आजार होऊ नये यासाठी मार्गदर्शन देखील केले जात आहे. यावेळी शरद तायडे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. शिवसेना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील . यावेळी नागरिकांना मास्क देखील वाटप करण्यात येऊन माहितीचे पोस्टर्स वाटण्यात आले. दिवसभरात 1691 लोकांची तपासणी करण्यात आली. यातील 3 जणांना ताप दिसला. त्यांना समुपदेशन करून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. यावेळी मदत कक्षासाठी मनजीत जंगीड, तेजस दुसाने, पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, मयूर जाधव, आकाश धनगर, जितेंद्र छाजेड आदींनी परिश्रम घेतलें.