जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे आज शुक्रवार रोजी जळगाव जिल्हा दौ-यावर आले आहे. चार्टड विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे परीक्षांच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी नियोजित वेळेच्या सुमारे दिड तास उशिरा दुपारी 4.25 वाजता पोहोचले आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, कुलगुरू पी.पी.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, प्र-कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर हे उपस्थित होते. उदय सामंत यांच्यासोबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आहेत. ते आता परिक्षाविषयक आढावा घेत आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व चार्टड विमानाने औरंगाबादकडे प्रयाण करणार असल्याचे समसते







