मुंबई (प्रतिनिधी) – अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि ड्रग्स डीलर अनुज केशवानी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठा खुलासा झाला आहे. या चॅटमधून अनुज आणि शोविक ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. तसेच या चॅटमध्ये ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत.

झी न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाचा भाऊ शोविक आणि ड्रग्स डिलर अनुज केशवानी यांचे एक चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये अनुज केशवानी आणि शोविक चक्रवर्ती ड्रग्स डिलिव्हरीबद्दल बोलत आहेत. या चॅटमध्ये अनुज केशवानीने शोविकला बेकायदेशीर ड्रग्सचे फोटो शेअर केले आहेत. या चॅटनुसार पहिले अनुजने गांजाचे फोटो पाठवले मग शोविकने उत्तर दिले की ठीक आहे मला हे दे. जो माल पाठवणार आहे त्याची क्वॉलिटी चांगली ठेव, स्टफ चांगला ठेव. मागे जो माल आला होता तो चांगला नव्हता.
अनुज म्हणाला की हो ठीक आहे. मी स्वतः माल घ्यायला जातो आहे. शोविकचे उत्तर आले की थँक्स ब्रो, किती वाजता येणार डिलिव्हरी द्यायला.. हे ५० ग्रॅम असेल का? त्यावर अनुज केजवानीचं उत्तर आलं की साडे तीन चार वाजेपर्यंत. या चॅटमधून स्पष्ट समजतंय की हे ड्रग्स डिलेव्हरीबद्दल बोलणे चालू आहे.







