वडती ता. चोपडा प्रतिनिधी :- आज सेवा सप्ताह निमित्त व पंतप्रधान.नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका भारतीय जनता पाटीॅकडून आज पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांनी मोदीच्या कार्याचा गौरव केला कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तिचे अंतीम संस्कार करणार्या योध्द्यांचा सत्कार पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. चोपडा कोविड सेंटर मधील रुग्णानांना मास्क,व फळ,बिस्कीट पाकीट वाटप करण्यात आले, वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता


याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र . ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, चोपडा पं.स. उपसभापती भूषण भिल, जिल्हा चिटणीस राकेश पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, राजूभाऊ शर्मा, मनिषभाई गुजराती, बाजार समिती संचालक धनंजय पाटील, तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे, डाॅ.भारती क्षिरसागर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, भरत सोनगिरे, प्रकाश पाटील, पंकज पाटील, डाॅ.विक्की सनेर, सुनिल सोनगिरे, परेश धनगर, पिंटू पावरा, अल्पसंख्यांक आघाडीचे संजय श्रावगी, मगन महाजन, विठ्ठल पाटील, संभाजी पाटील, रावसाहेब पाटील ( सरपंच आडगाव), विवेक गुर्जर, विकास पाटील, बारकू पाटील, योगराज पाटील, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, विजय बाविस्कर, भाईदास कोळी, प्रणय टाटीया, मिलिंद वाणी, मोहित भावे, आदि उपस्थित होते.







