जळगाव [प्रतिनिधी]
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संवैधानिक पदांवर पात्र व्यक्तींच्या नियुक्तीची मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांसह शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये आज पर्यंत बरीच संवैधानिक पदे रिक्त आहेत . वित्त व लेखाधिकारी , कुलसचिव आणि परीक्षा मूल्यमापन संचालक ही ए रिक्त आहेत . वारंवार विद्यापीठाकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे अर्ज दाखल करून देखील आजतागायत त्या नियुक्त्या केल्या गेलेल्या नाहीत विद्यापीठ अधिनियम 2016 चे कलम 85 नुसार विद्यापीठांच्या कुलगुरूंना सहा महिन्यापर्यंत वरील तीनही जागा भरता येतात परंतु त्यानंतर सरकारची परवानगी घेऊन त्या जागेवर कायमस्वरूपी व्यक्तीची नेमणूक करता येते परंतु या विद्यापीठात अशी कुठलीही पद्धत अवलंबली जात नाही
या विद्यापीठात आजपर्यंत एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची हुकूमशाही चालू होती ती मोडीत काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन व्यक्तींची नेमणूक करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार नाही याची नोंद घ्यावी अशी मागणी या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस शहर सचिव अँड कुणाल पवार, भूषण भदाणे, कल्पिता पाटील गणेश निंबाळकर आदींनी केली आहे .







