मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने पुन्हा जमावबंदीचे आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.

काल मुंबई पोलिसांच्या डीसीपी ऑपरेशन्सने सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत एक आदेश जारी केला आहे, जो मुंबई शहरात ३० सप्टेंबरपर्यंत लागू असेल.







