श्रीनगर – जम्मू कश्मीर मधील श्रीनगर येथे गुरुवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, दहशतवाद्यासोबत चकमकीत सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्यासह स्थानिक महिला जखमी झाली आहे. जखमी अधिकाऱ्याचे नाव राहुल माथूर असून त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच जखमी महिलेची ओळख पटली असून महिलेचे नाव कौसर जान आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती, जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिली.
दरम्यान, बुधवारी रात्री श्रीनगरमधील बटमालू भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर जवानांनी या परिसराला घेरा घातला आणि दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांना गोळीबार सुरू केल्याने जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. यादरम्यान झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक महिला ठार झाली, तर सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले.







